भारताने अत्यंत रुचकर, स्वादिष्ट आणि पोषक अशी खाद्य संस्कृती संपूर्ण जगाला दिली. आज जगाच्या पाठीवर जिथेही पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे तिथे भारतीय रेस्टोरंट असणारच….!!!!!!!! अशी ही आपली खाद्य संस्कृती … जीने जगाला खूप सार्या पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थांचा खजिना दिला….आज आपण पाहणार आहोत भारतीय चहा संस्कृती. जरी त्याचा उगम आपल्या देशात झाला नसला तरीही आपल्या नसानसात ती भिनली आहे.
आसाममधील प्रसिद्ध चहा आणि दार्जिलिंग चहासह भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. चहा हे आसामचे ‘राज्य पेय'(स्टेट ड्रिंक) आहे. माजी नियोजन आयोगाचे (नंतरचे निती आयोगाचे ) उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांनी २०१३ मध्ये चहाला अधिकृतपणे “राष्ट्रीय पेय” म्हणून मान्यता देण्याची योजना आखली होती.आणि सगळ्यात मोठी गमतीशीर गोष्ट म्हणजे, डिसेंबर २०११ मध्ये जाहीर झालेल्या असोचॅमच्या अहवालानुसार भारत जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश असून जवळपास संपूर्ण जगातील चहा उत्पादनाच्या ३०% उत्पादनाचा वापर भारत देश करतो. चीन नंतर भारत दुसर्या क्रमांकाचा चहा निर्यात करणारा देश आहे.
आपल्या देशात आयुर्वेदाला खूप मोठे स्थान आहे. किती तरी आयुर्वेदाचार्य आपल्याला निरोगी आणि सुदृढ आयुष्याचा कानमंत्र देऊन गेलेत. जी त्यांनी लिहिली आणि येणार्या कित्येक पिढ्यांनी ती जतन करून ठेवली. आयूर्वेदाच्या अभ्यासामुळे हर्बल टी पिण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. पारंपारिक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये औषधी फायदे असणारी पवित्र तुळस , वेलची , मिरपूड, मदिरा (मुलती), पुदीना इत्यादी विविध वनस्पती आणि मसाले फार पूर्वीपासून वापरले जात आहेत. आणि पारंपारिकरित्या वापरत आलेल्या ह्या घटकांपासून बनवलेल्या चहाचे वर्षानुवर्ष सेवन होत आले आहे .चहा मध्ये वापरण्यात येणारे साखर आणि दूध हे चाहाच्या औषधी घटकांचा स्वाद बदलून चहाला रोमांचक अशी चव प्रधान करते, तर वेलची, लवंग आणि आल्यासारख्या आरोग्यादायी फायद्यांनी भरलेले घटक जर आपल्या चहाची रंगत वाढवत असतील तर त्याची मज्जा काही औरच….
बर्याच वर्षांपासून, भारतातील चहा विषयक माहिती ही इतिहासात विलीन झाली होती.बौद्ध भिक्षू बोधिधर्म आणि गण लू यांच्या कथा आणि चहासह त्यांचा सहभाग असल्यामुळे इ.स च्या पहिल्या शतकात ह्या बाबतच्या नोंदी पुन्हा वरती आल्या.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी येई पर्यंत भारतामध्ये चहाचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले नव्हते. त्या मुळे एका अर्थी असे ही म्हणु शकतो की, ब्रिटिश सत्ते ने भारताला एक व्यावसायिक दृष्टीकोण प्रधान केला.
आपल्या देशातील चहाचा प्रवास हा खूप जुना आणि मोठा आहे ….. आजच्या दिवशी काहीही असो .. सुख-दुख, उत्सव-शोक,गरीब-श्रीमंत कोणीही असो पहिला आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आणि हवाहवासा वाटणारा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे “चहा घेणार ना ?”……. जसं रक्त आपल्या नसानसात वाहत असतं… तसंच काहीसं चहाच सुद्धा झालंय…. चहा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग बनलाय…. कोणाला तो तरतरी देतो … तर कोणाला उत्साह… कोणाच्या अंगी रोमांच उसळतो… तर कोणाला ताजंतवानं करून जातो….. प्रत्येक माणूस जसा वेगळा आहे, त्याचे स्वभाव,वृत्ती भिन्नभिन्न आहेत … त्याच प्रमाणे प्रत्येकाचा चहा सुद्धा आवडीनुसार वेगवेगळा असतो. आपल्या आयुष्यातले बरेचसे किस्से ह्या चहा सोबतच रंगतात….. दिवसाची सुरुवात म्हणजेच तो गरमागरम चहाचा प्याला…आणि त्या बरोबर येते ती प्रचंड अशी ताकद येणार प्रत्येक आव्हान पेलवण्याची …………
निश्चितच तुमचं आणि तुमच्या चहाच असच काहीसं घट्ट नात नक्कीच असेल… हो ना ..
लेखिका
अक्षता पडवळ